Ad will apear here
Next
अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात बक्षीस वितरण
परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण झाले. विद्यार्थ्यांसमवेत मागे उभे मंगेशकुमार पाटील, विनोद नारकर व शिक्षक.

रत्नागिरी :
परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात इयत्ता पहिली व दुसरीच्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मत्स्य महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक मंगेशकुमार पाटील यांच्या हस्ते झाले.

मंगेशकुमार पाटील यांचे स्वागत करताना मुख्याध्यापक विनोद नारकर. सोबत महेश साळुंके.

परशुरामपंत अभ्यंकर यांचा स्मृतिदिन व शाळेच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभ्यंकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त बौद्धिक, हस्ताक्षर व धावणे, मारचेंडू, लंगडी, क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या वेळी मुख्याध्यापक विनोद नारकर, शिक्षक महेश साळुंके उपस्थित होते. श्री. नारकर यांनी अभ्यंकर यांच्याविषयी माहिती दिली. 

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मंगेशकुमार पाटील.

श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ‘स्पर्धेत बक्षीस मिळवणे हे उद्दिष्ट न ठेवता सहभागी होणेसुद्धा महत्त्वाचे असते. पालक, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अशा प्रकारे प्रोत्साहन दिल्यास भविष्यात शाळेतून चांगले क्रीडापटू तयार होतील,’ असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी शिक्षिका ज्योती शेंडगे, संपदा सावंत, स्मिताली परब, प्रिया साळुंखे, स्वप्नाली आयरे, सेविका रोहिणी कांबळे यांनी मेहनत घेतली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZJXBY
Similar Posts
परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिरात संकल्प दिन रत्नागिरी : दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी आज (सहा सप्टेंबर २०१८) विविध संकल्प केले. या वेळी आचार्य म्हणून आगाशे विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम उपस्थित होत्या.
अभ्यंकर विद्यालयातील ज्ञानदीप लावणारे दीपपूजन रत्नागिरी : रत्नागिरीतील दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यालयात दिव्यांची अमावास्या अनेक वर्षांपासून अनेक प्रकारचे दीप प्रज्ज्वलित करून साजरी केली जाते. सण, संस्कृतीची विद्यार्थ्यांना ओळख होण्यासोबतच विविध प्रकाशस्रोतांची माहिती त्यांना व्हावी, हा त्यामागचा हेतू असल्याचे मुख्याध्यापक विनोद नारकर सांगतात
‘विद्यार्थ्यांनी मनातील दीप प्रज्ज्वलित करावा’ रत्नागिरी : ‘दीप अमावास्येनिमित्त दिव्यांचे लक्षवेधी प्रदर्शन आयोजित करून परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यालय व इंग्रजी माध्यमाची शाळा विद्यार्थ्यांच्या मनावर प्रेरणेचा संस्कार करते आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मनातला दीप प्रज्ज्वलित करून शाळेचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे,’ अशी भावना रत्नागिरीतील दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड
परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिरात विद्यार्थ्यांनी रचले मानवी मनोरे रत्नागिरी : दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात १६ मार्च रोजी इयत्ता तिसरी व चौथीतील ३५० विद्यार्थ्यांनी शारीरिक कवायती सादर केल्या आणि मानवी मनोरे रचले. विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घातले, लेझीमप्रकारही सादर केले आणि सामुदायिक कवायतीही सादर केल्या. परशुरामपंत अभ्यंकर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language